Tathagat Vidhyalay-Karbhand
कन्हानपारशिवनी

हीट अॅण्ड रन कायदाचा विरोधात वाहन चालकांचे निषेध मोर्चा काढत धरना प्रदर्शन

पोलीस निरीक्षका मार्फत केंद्रीय गृहमंत्री यांना निवेदन

हीट अॅण्ड रन कायदाचा विरोधात वाहन चालकांचे निषेध मोर्चा काढत धरना प्रदर्शन

पोलीस निरीक्षका मार्फत केंद्रीय गृहमंत्री यांना निवेदन

कन्हान – केंद्र सरकार ने तयार केलेल्या हीट अॅण्ड रन कायदाचा विरोधात कन्हान येथे मानवाधिकार संरक्षण संघटना द्वारे वाहन चालकांनी निषेध मोर्चा काढत धरना प्रदर्शन करुन पोलीस निरीक्षका मार्फत केंद्रीय गृहमंत्री यांना निवेदन पाठवुन हीट अॅण्ड रन कायदा तात्काळ रद्द करण्याची मागणी केली आहे.

केंद्र सरकार च्या नवीन वाहतुक कायदा विरोधात १ जानेवारी पासुन देशभरात मोठ्या प्रमाणात आंदोलन सुरु झाले आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी महामार्गा वरची वाहतुक खोळंबली आहे. नवीन कायद्यानुसार ट्रक ने अपघात झाल्यास चालकाला दहा वर्षाची शिक्षा आणि सात लाख रुपए दंडाची तरतुद आहे. या कायद्या विरोधात वाहन चालकां मध्ये तीव्र असंतोष निर्माण झाले आहे.

काल मंगळवार ला कन्हान येथे मानवाधिकार संरक्षण संघटना पारशिवनी तालुका अध्यक्ष पंकज रामटेके यांचा नेतृत्वात वाहन चालकांनी केंद्र सरकारच्या विरोधात जोरदार निर्दशने करुन पोलीस स्टेशन ते तारसा चौक आणि परत तारसा चौक ते पोलीस स्टेशन पर्यंत निषेध मोर्चा काढत धरना प्रदर्शन करुनहीट अॅण्ड रन कायदाचा विरोध केला आणि पोलीस निरिक्षक सार्थक नेहेते यांचा मार्फत केंद्रीय गृहमंत्री यांना निवेदन पाठवुन हीट अॅण्ड रन कायदा तात्काळ रद्द करण्याची मागणी केली आहे.

या प्रसंगी एस.बि.थामस, नरेंद्र पात्रे, ओमप्रकाश भुरे, रवि भायगोले, विष्णु पाहुणे, चंद्रभान जयपुरकर, प्रज्वल पाहुणे, प्रदिप इंगोले, अखिलेश गेडाम, तुलसीदास राऊत, शेषराव ठवकर, रंजित वासनिक, संभा मारबते, प्रदिप भुरे, अमोल भोयर, गजनलाल सिरसाम, संपत बावने, निलकंठ मेश्राम, विशाल सोनावने, राजु कश्यप, बादल देवगडे, प्रमोद जामकर, सुभाष मेश्राम, रोशन मेश्राम, विक्की ढोबळे सह आदि वाहन चालक मोठ्या संख्येत उपस्थित होते.

कन्हान प्रतिनिधि – ऋषभ बावनकर

Sanus's Fair Touch

pudhakar24news.com

pudhakar24news.com च्या सर्व लेखाचे हक्क राखून ठेवले आहे. pudhakar24news.com न्यूस पोर्टल च्या संबंधित कुठलेही वाद केवळ नागपूर सत्र न्यायाल्याच्या कार्यकक्षेतच राहतील.
Back to top button
error: Content is protected !!