Tathagat Vidhyalay-Karbhand
कन्हानपारशिवनी

कन्हान परिसरात कोरोना काळातील सर्व नियम व निर्बंध कडक करण्याची मागणी: कन्हान शहर विकास मंच

कन्हान परिसरात कोरोना काळातील सर्व नियम व निर्बंध कडक करण्याची मागणी: कन्हान शहर विकास मंच

कन्हान शहर विकास मंच पदाधिकार्यांचे नप मुख्याधिकारी व नगराध्यक्षांना निवेदन

कन्हान – महाराष्ट्र राज्यात आॅमिक्रान रुग्ण सातत्याने वाढत असुन नागपुर शहरात एक आॅमिक्रान रुग्णांची नोंद झाली असुन सुद्धा कन्हान परिसरात कोरोना काळातील सर्व नियमाचे उल्लंघन होत असल्यावर ही कन्हान – पिपर नगर परिषद प्रशासन कुठल्याही प्रकारची कारवाई न करीत असल्याने कन्हान शहर विकास मंच च्या पदाधिकार्यांनी मंच संस्थापक अध्यक्ष रुषभ बावनकर यांच्या नेतृत्वात नप मुख्याधिकारी हर्षल गायकवाड व नगराध्यक्षा करुणाताई आष्टणकर यांना भेटुन या गंभीर विषयावर चर्चा करुन तसेच एक निवेदन देऊन तात्काळ उपाय योजना करुन शहरात व परिसरात कोरोना काळातील सर्व नियम व निर्बंध कडक करण्याची मागणी केली आहे .

देशात , राज्यात , जिल्ह्यात मागील दोन वर्षापासुन कोरोना रुग्णांची संख्या सातत्याने वाढत असुन सध्याचा परिस्थितित ग्रामीण भागात कोरोचा चा प्रादुर्भाव नियंत्रणात आहे .

परंतु राज्य शासना ने कोरोना काळातील नियम व निर्बंध कायम ठेवले असुन सुद्धा शहरातील बाजारात कोरोना काळातील सर्व नियमाचे उल्लंघन होत आहे . केंन्द्र शासनाने काही दिवसान पुर्वी देशासह संपुर्ण राज्यात ओमिक्राॅन चा शिरकाव होण्याचे संकेत दिले होते व  नवीन गाईड लाईंन्स सुद्धा बनविण्यात आली होती .

त्यानंतर देशात ओमिक्राॅन चा शिरकाव झाला असुन सध्या ७० ओमिक्राॅन रुग्णांची नोंद झाली आहे या मध्ये महाराष्ट्र राज्यात ३० ओमिक्राॅन रुग्णांची नोंद असुन नागपुर शहरात १ ओमिक्राॅम रुग्णांची नोंद झाली असुन सुद्धा कन्हान – पिपरी  नगर परिषद प्रशासन कुठल्याही प्रकारची कारवाई करत नसल्याने कन्हान शहर विकास मंच च्या पदाधिकार्यांनी मंच संस्थापक अध्यक्ष रुषभ बावनकर यांच्या नेतृत्वात नप मुख्याधिकारी हर्षल गायकवाड व नगराध्यक्षा करुणाताई आष्टणकर यांना भेटुन या गंभीर विषयावर चर्चा करुन तसेच एक निवेदन देऊन तात्काळ उपाय योजना करुन शहरात व परिसरात कोरोना काळातील सर्व नियम व निर्बंध कडक करण्याची मागणी केली आहे .

या प्रसंगी कन्हान शहर विकास मंच संस्थापक अध्यक्ष रुषभ बावनकर , उपाध्यक्ष महेंद्र साबरे , सचिव हरीओम प्रकाश नारायण , महासचिव सुरज वरखडे , कोषाध्यक्ष महेश शेंडे , सदस्य प्रकाश कुर्वे , शाहरुख खान , भरत सावळे , हर्ष पाटील , किरण ठाकुर , अक्षय फुले , शुभम मंदुरकर , सह आदि मंच पदाधिकारी उपस्थित होते .

Sanus's Fair Touch

pudhakar24news.com

pudhakar24news.com च्या सर्व लेखाचे हक्क राखून ठेवले आहे. pudhakar24news.com न्यूस पोर्टल च्या संबंधित कुठलेही वाद केवळ नागपूर सत्र न्यायाल्याच्या कार्यकक्षेतच राहतील.
Back to top button
error: Content is protected !!