Tathagat Vidhyalay-Karbhand
गडचिरोली

जोगीसाखर-शंकरनगर जंगलात वाघाच्या हल्यात एकाचा बळी

परिसरात आतापर्यंत ११ जणांचा बळी

जोगीसाखर-शंकरनगर  जंगलात वाघाच्या हल्यात एकाचा बळी

परिसरात आतापर्यंत ११ जणांचा बळी

आरमोरी परिसरात  नरभक्षक वाघांनी आरमोरी अरसोडासह विविध ठिकाणी १० बळी घेतल्यानंतर मानवी रक्ताची चटक लागलेल्या नरभक्षक वाघाने ११ वा बळी घेतल्याची घटना  आरमोरी तालुक्यातील जोगीसाखरा गट ग्रामपंचायतीमध्ये येणाऱ्या सालमारा येथे घडली.  अत्पभुधारक शेतकरी सालमारा येथुन शंकरनगर जंगलातील कम्पारमेट नंबर ४७ रस्तेने सायकलींचे  जात असताना नाल्याला पुल नसल्यामुळे उतरुन पायदळ  जात असताना रस्तेच्या कडेला दबा धरून बसलेल्या वाघाने बळीराम कोलते या ईसमावर हल्ला करुन काही अंतरावर  फरकडत नेऊन जागीच ठार केले. ही घटना  सकाळी आठच्या सुमारास घडली ते ४७ वर्षाचे होते.आतापर्यंत ११ वा  बळी घेतला

सदर माहिती सरपंच संदिप ठाकुर , रयत शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष दिलीप घोडाम ,अखिल भारतीय किसान सभा शेतमजूर युनियनचे अमोल मारकवार  याना मिळताच घटना स्थळी जाऊन पाहणी केली व वनविभागाचे अधिकारी वेळेवर उपस्थित न झाल्याने घटनास्थळीच ठिय्या आंदोलन करण्यात आले , जो पर्यंत वनअधिकारी येऊन मागच्या पुर्ण  करणार नाही तो पर्यंत मृतदेह वनविभागाच्या ताब्यात राहाणार असा पवित्रा घेतल्याने बराच काळ वातावरण चिघळले. वातावरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन  वनपरीक्षेत्र अधिकारी अविनाश मेश्राम यांनी पोलिसांना पाचारण केले. यावेळी विविध मागण्यां करण्यात आल्या.   मृतकाच्या कृटुबियांना अत्यविधी साठी जागेवर ५० हजार रुपये द्या. सानुग्रह अनुदानात वाढ करुण शेतकऱ्यांना शेतीवर जाण्यासाठी संरक्षण द्यावे, वाघाचा बंदोबस्त तात्काळ करावा अशा मागण्या रेटुन धरल्या. यात देसाईगंज सहायक उपवनसंरक्षक चव्हाण यांनी  मागण्या  मान्य केल्याने  वातावरण आटोक्यात आल्यानंतर मृतदेह  शवविच्छेदना पाठविले.

अधिक तपास सहायक उपवनसंरक्षक चव्हाण, वनपरीक्षेत्र अधिकारी अविनाश मेत्राम पोलिस निरीक्षक मनोज काळबांधे उपक्षेत्र सहायक गाजी शेख उपक्षेत्र सहायक राजु कुंभारे, वनरक्षक करकाडे     आणि गेडाम करीत आहेत.

यात वाघानी बळी घेतलेल्या जगलालगत शंकरनगर जोगीसाखरा सालमारा परीसरातील शेतकऱ्यांच्या मोठ्या प्रमाणात शेत्या असल्यामुळे शेतकऱ्यांत दहशत निर्माण झाल्याने तात्काळ वाघाचा बंदोबस्त करा अन्यथा वनपरीक्षेत्र कार्यालयावर भव्य मोर्चा काढण्यात येईल असा इशारा जोगीसाखरा गट ग्रामपंचायतीचे सरपंच संदिप ठाकुर रयत शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष दिलीप घोडाम यांच्या नेतृत्वात परीसरातील जनतेनी दिला आहे.

गडचिरोली-चक्रधर मेश्राम दि. 31/08/2022

Sanus's Fair Touch

pudhakar24news.com

pudhakar24news.com च्या सर्व लेखाचे हक्क राखून ठेवले आहे. pudhakar24news.com न्यूस पोर्टल च्या संबंधित कुठलेही वाद केवळ नागपूर सत्र न्यायाल्याच्या कार्यकक्षेतच राहतील.
Back to top button
error: Content is protected !!