Tathagat Vidhyalay-Karbhand
ब्रह्मपुरी

तळोधी येथे ग्रामपंचायत सेवानिवृत्त कर्मचारी यांना निरोप समारंभ संपन्न झाला

तळोधी येथे ग्रामपंचायत सेवानिवृत्त कर्मचारी यांना निरोप समारंभ संपन्न झाला.

महाराष्ट राज्य ग्रामपंचायत कर्मचारी युनियन 4511 शाखा नागभीड च्या वतीने आज दिनांक 08:10:2022 ला साई मंदिर तळोधी येथे ग्रामपंचायत सेवानिवृत्त कर्मचारी यांना निरोप समारंभ संपन्न झाला
या कार्यक्रमाची सुरुवात वैराग्यमुर्ती संत गाडगे महाराज यांच्या प्रतिमेस पुजन करुन्‍ मान्यवरांचे स्वागत करण्यात आले.
त्यानंतर ग्रामपंचायत सेवानिवृत्त कर्मचारी प्रभाकरजी गराडे, नारायण मेंढे, नारायण अमृतकर, देवराम सिडाम,संतोष लांजेवार, महादेव नक्षीणे, सुरेश मेश्राम यांना शाल व श्रीफळ व गुच्छा देवुन निरोप देण्यात आले.

या कार्यक्रमाची प्रास्ताविक अतुल दादाजी पांडव ग्रामपंचायत कर्मचारी युनी.अध्यक्ष नागभीड यांनी केले असता कर्मचारी हा सतत काम करतो तरी पण महाराष्ट शासनाला ग्रा.पं.कर्मचारी आहे कि,नाही याची जाणीव करुन्‍ देणे आवश्यक आहे त्या करीता संघटनेमध्ये संघटीत राहुन काम करणे आवश्यक आहे,ग्रा.पं. कर्मचा-यांकडे कुणीही लक्ष देत नाही तर मी त्यांचा मान सन्मान व्हावा या उदेशाने व एकतेच्या भावनेने हा निरोप देण्यात येत आहे.

तर कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणुन ॲड.सौ.शर्मिला रतनकुमार रामटेके यांनी आपल्या मार्गदर्शनातुन सांगीतले की,भारत देशात लोकशाही आहे व देशाचा कारभार हा भारतीय राज्यघटनेनुसार चालत आहे आणि भारतीय राज्यघटनेमध्ये समान किमान वेतन आयोगानुसार सर्वाना समान वेतन मिळाले पाहीजे आहे परंतु तसे न होता ग्रामपंचायत मध्ये काम करणारा व्यक्तीला समानता न देता तुटपुंज्या वेतनावर काम करायला येथील सरकार मजबुर करीत आहे, तसेच ग्रामपंचायत कर्मचारी हा गरीब कर्मचारी आहे आणि त्यांचा त्या वेतनात कुटूंबाचा उदरनिर्वाह होत नाही तरीपण तो काटकसरीपणे उदरनिर्वाह करतो तरीपण त्यांना 5 ते 6 महिणे पगार मिळत नाही,आज अशी परीस्थिती निर्माण झाली आहे कि,कित्येक महाराष्टातील कर्मचारी आत्महत्या करण्यास प्रवृत्त झालेले आहे करीता त्यांना दर महीण्याला ठराविक कालावधीमध्ये पगार दयावे असे सुंदर मार्गदर्शन केले.

प्रशांतभाऊ गायकवाड यांनी कर्मचा-याला मार्गदर्शन करुन्‍ आपला गावाचा कर्मचारी आहे तो कर्मचारी प्रथम गावचा नागरीक आहे असे खुप सुंदर मार्गदर्शन केले. शरदभाऊ सोनवाने यांनी ग्रामपंचायत कर्मचारी यांची व्यथा सविस्तर मांडले, दिवाकरजी चावरे जेष्ठ कर्मचारी यांनी कर्मचा-याची दशा व दिशा यांच्यावर सविस्तर मार्गदर्शन केले. अश्वीनी मेश्राम कार्यक्रमाचे अध्यक्ष यांनी संघटनेविषयी सविस्तर मार्गदर्शन केले.

या कार्यक्रमाला अश्वीनी मेश्राम ग्रा.पं.कर्मचारी युनी.अध्यक्ष चंद्रपुर, अतुल दादाजी पांडव ग्रा.पं.कर्मचारी युनी.अध्यक्ष तालुका नागभीड, शर्मिला रतनकुमार रामटेके सरपंच नवेगांव पांडव ,प्रशांतभाऊ गायकवाड सरपंच गिरगाव, शरदभाऊ सोनवाने उपसरपंच गिरगाव, सुनिल मडावी ग्रा.पं.कर्मचारी युनी.अध्यक्ष तालुका राजुरा, दिवाकरजी चावरे जेष्ठ कर्मचारी गिरगाव उपस्थित होते तसेच प्रामुख्याने ग्रामपंचायत कर्मचारी युनीयन चे सर्व सभासद व पदाधिकारी व कर्मचारी उपस्थित होते,
या कार्यक्रमाचे संचालन प्रमोदभाऊ गोंगल यांनी केले व सर्व पाहुण्याचे आभार प्रदर्शन अतुल दादाजी पांडव ग्रा.पं.कर्मचारी युनी.अध्यक्ष तालुका नागभीड यांनी केले.

Sanus's Fair Touch

pudhakar24news.com

pudhakar24news.com च्या सर्व लेखाचे हक्क राखून ठेवले आहे. pudhakar24news.com न्यूस पोर्टल च्या संबंधित कुठलेही वाद केवळ नागपूर सत्र न्यायाल्याच्या कार्यकक्षेतच राहतील.
Back to top button
error: Content is protected !!