Tathagat Vidhyalay-Karbhand
नागपूर

दीक्षाभूमी नागपूर येथे भोजनदान चा ४० वर्षाचा वसा

दीक्षाभूमी नागपूर येथे भोजनदान चा ४० वर्षाचा वसा
पंचशील महिला मंडळाच्या पूढाकारानी, दीक्षाभूमी विहारात जवळपास ४० वर्षांपासून भिक्षु संघास दीक्षाभूमीच्या विहाराच्या परिसरात भोजन दान केले जात आहे.
धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या पावन पर्व वर पूर्वी येणारे बहुसंख्य भन्ते हे उपाशीच राहायचे व अनुयायी उपाशीच वापस घरी जायचे.
त्या सर्व भिक्कू संघाला व उपासकांना एकवेळचे का होईना! त्यांना जेवण उपलभ करून भोजन दान करण्यात आले . ह्या पारंपरिक वास ला जवळपास ४० वर्ष होत आहे व ह्या सर्व भोजनदानाची सुर्वात भदन्त आनंद कौसल्यानं यांनी भिक्कू संघातील भिक्कूनी यांना भोजन व्यवस्था करायला सांगितले व तेव्हापसून सलग ४० वर्ष होत आहे , तेव्हापासून दीक्षाभूमीच्या परिसरात भोजनदानाचा वसा जपला जात आहे.
परंतु सध्या संपूर्ण जगावर कोरोना महामारीचा प्रकोप असून सुद्धा कुठल्यंही प्रकारची खंडन न पडता सतत पंचशील महिला मंडळाचा पुढाकार च्या माध्यमातून हे कार्य सुरु आहे. कोरोना मुळे ह्या वेळेस दीक्षाभूमी विहार बंद आहे. म्हणून प्रतिबंधात्मक नियमांचे पालन करून व शासन दिशानिर्देशाचे पालन करून. दीक्षाभूमी विहारातील भिक्कू संघाला भोजन दान केले. भिक्खुणी रुपानन्दा म्हणाल्या १९८० च्या दशका च्या अगोदर धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या दिवशी भोजनदानाची कुठलीही सुविधा नव्हती, उपासक उपासिकांना भोजन तयार करण्याची कुठलीही सुविधा नव्हती. भदन्त आनंद कौसल्यान यांनी हा भोजन दानाचा विषय गंभीरतेने घेतला व भोजनदानाची सूचना दिली व १९८० पासून हे भोजनदानाचे कार्य निरंतर सुरु आहे.ह्याचा भोजनदाना पुढाकाराने पंचशीला महिला मंडळाची सुरुवात झाली व ह्या महिला मंडळात नागपूरच्याच महिला नाही तार मुंबई, व संपूर्ण महाराष्ट्रा शहरातल्या महिला जुळून काम करीत आहे. ह्यात. ७० भिक्कू पासून सुरु झालेली भोजन दान परंपरा आता तब्बल ३००० हजाराच्या वर आहे…
ह्या पंचशीला महिला मंडळाच्या महिला लोकांच्या घरोघरी जाऊन भोजनदाना सामुग्री स्वीकारतात व व ह्यातून सलग तीन दिवस नागपूर दीक्षाभूमी च्या परिसरात, धम्मचक्र प्रवर्तन दिच्या दिवसाशी पासून भोजन दाण करत असतात . पण ह्या वर्षी कोरोना चे संक्रम कमी होण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या दिशानिर्देशाचे पालन करीन दीक्षाभूमी जनतेसाठी बंद ठेवण्यात आल्याने.. निवडक बोद्धविहारात भोजन दान केले. त्यानुसार बुद्धभूमी महाविहार खैरी, महाप्रजापती गौतमी बौद्धविहार , कुशीनगर नागार्जुन येथील भिक्खू संघास भोजन दान करण्यात आले.
रविवार दिनांक २५/१०/२०२० ला धम्मचक्र प्रवर्तन दिनी दीक्षाभूमी येथील बौद्धविहार येथील सुगत बोधी भन्ते यांच्या सहकर्यानी भोजन दान करण्यात आले. व सोमवारी दि २६/१०/२०२० ला भदन्त नागार्जुन सुरई ससाई यांच्या नेतृत्वात इंदोरा बौद्धविहारात भोजनदान करण्यात आले.

ही परंपरा भिक्खुणी रूपानंदा यांच्या नेतृत्वात पंचशील महिला मंडळ च्या उज्वला मेश्राम, शारदा पानतावणे , अतुल मेश्राम, नर्मदा पाटील, करून जाधव , निर्मला चवरे. लीलाबाई बोरकर, अनुसया चवरे, मून. मंद भगत, बबिता पानतावणे, सुकेशनी बागडे, माया चिमणकर , दुर्गा निकोसे, आम्रपाली वानखेडे, शलिनी भेलावे, उर्मिला चवरे, प्रमिला घोडेस्वार,प्रीती वाघमारे ,रत्नमाला वऱ्हाडे ,पार्वती माटे, प्रतिमा मेश्राम इत्तयादी उपासक व उपासिका पंचशील महिला मंडळांनी परिश्रम घेतले.

Sanus's Fair Touch

pudhakar24news.com

pudhakar24news.com च्या सर्व लेखाचे हक्क राखून ठेवले आहे. pudhakar24news.com न्यूस पोर्टल च्या संबंधित कुठलेही वाद केवळ नागपूर सत्र न्यायाल्याच्या कार्यकक्षेतच राहतील.
Back to top button
error: Content is protected !!