Tathagat Vidhyalay-Karbhand
नाशिकसुरगाणा

भारतीय संविधान जगात श्रेष्ठ-प्रा.संजय महाजन

भारतीय संविधान जगात श्रेष्ठ – प्रा.संजय महाजन

सुरगाणा महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित, कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय सुरगाणा येथे राज्यशास्त्र विभाग आणि राष्ट्रीय सेवा योजना यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक २६ नोव्हेंबर 2022 रोजी भारतीय संविधान दिन साजरा करण्यात आला. महाविद्यालयाचे प्राचार्य. डॉ.सी. जी. दिघावकर यांच्या मार्गदर्शनाखाली सदर कार्यक्रम संपन्न झाला. प्रमुख वक्ते प्रा. संजय महाजन हे होते. ते म्हणाले की ,संविधानाबाबत जनजागृती करण्यासाठी आणि आंबेडकरांच्या विचारांचा प्रसार करण्याच्या उद्देशाने देशभरात संविधान दिन साजरा केला जातो. भारतीय संविधानाच्या निर्मितीसाठी मसुदा समिती स्थापन केली होती. अनेक बैठका व चर्चासत्रानंतर या समितीने सादर केलेला अंतिम मसुदा 26 नोव्हेंबर 1949 रोजी संविधान सभेने स्वीकारला होता. त्यामुळे 26 नोव्हेंबर हा दिवस संविधान दिन म्हणून साजरा केला जातो. हा दिवस भारताच्या लोकशाही इतिहासात अतिशय खास मानला जातो .या दिवशी भारतीय लोकशाहीचा पाया रचला गेला. हा दिवस राष्ट्रीय कायदा दिवस म्हणूनही साजरा केला जातो. भारताची राज्यघटना हे देशाचे संविधान किंवा पायाभूत कायदा आहे. 26 जानेवारी 1950 पासून राज्यघटना अमलात आली. भारताची राज्यघटना ही उद्देशिका, मुख्य भाग व 12 पुरवण्या असून त्यांची अनेक प्रकरणांमध्ये विभागणी केलेली आहे. भारतीय संविधान जगातल्या सर्वात मोठ्या संविधानांमध्ये मोडते. भारतीय संविधानाच्या उद्देश पत्रिकेप्रमाणे भारत हे सार्वभौम, समाजवादी, धर्मनिरपेक्ष, लोकशाही व प्रजासत्ताक आहे. मूळ उद्देशिकेत समाजवादी व धर्मनिरपेक्ष हे शब्द नव्हते. राज्यघटनेच्या 42 व्या घटना दुरुस्तीद्वारे ते उद्देश पत्रिकेत समाविष्ट करण्यात आले. भारतीय राज्यघटनेचे मूलभूत अधिकार, मूलभूत कर्तव्य , मार्गदर्शक तत्वे आणि संघराज्य प्रणाली हे वैशिष्ट्य आहेत. आपल्या संविधानाने देशातील प्रत्येक नागरिकाला स्वतंत्र भारतात राहण्याचा समान अधिकार दिलेला आहे . पाश्चिमात्य संस्कृतीच्या युगात देशातील तरुणांमध्ये संविधानाची मूल्य रुजवणे हा संविधान दिन साजरा करण्याचा मुख्य उद्देश असला पाहिजे असेही ते म्हणाले. कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा. व्ही. डी. अहिरे हे होते .सूत्रसंचालन राष्ट्रीय सेवा योजना प्रमुख प्रा. एस. आर. पावडे यांनी केले. प्रस्ताविक राज्यशास्त्र विभाग प्रमुख प्रा. एस. एम. भोये यांनी केले .आभार प्रा. गोरी इल्ल्यास यांनी मांडले .यावेळी महाविद्यालयाचे कार्यालयीन अधीक्षक श्री. आर. टी. चौधरी, प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी उपस्थित होते.

स्थानिक प्रतिनिधी – किशोर जाधव, सुरगाणानाशिक

Sanus's Fair Touch

pudhakar24news.com

pudhakar24news.com च्या सर्व लेखाचे हक्क राखून ठेवले आहे. pudhakar24news.com न्यूस पोर्टल च्या संबंधित कुठलेही वाद केवळ नागपूर सत्र न्यायाल्याच्या कार्यकक्षेतच राहतील.
Back to top button
error: Content is protected !!