Tathagat Vidhyalay-Karbhand
पुणेमावळ

मावळ मध्ये लोणावळा, कान्हे येथे २ उपजिल्हा रुग्णालय,वडगाव प्रशासकीय इमारत, पोलीस स्टेशन इमारत, 14 पूल, जल जीवन योजना व इतर विकास कामांसाठी 756 कोटीचा निधी मंजूर

मावळ मध्ये लोणावळा, कान्हे येथे २ उपजिल्हा रुग्णालय,वडगाव प्रशासकीय इमारत, पोलीस स्टेशन इमारत, 14 पूल, जल जीवन योजना व इतर विकास कामांसाठी 756 कोटीचा निधी मंजूर

आमदार सुनिल शेळके सर्वसामान्य नागरिकांचे प्रश्न सोडविण्याचे काम करणारे नेतृत्व  – उपमुख्यमंत्री अजित पवार

रोज सूर्य उगवतो रोज मावळतो पण मावळातील आमदार सुनील शेळके सारखा सूर्य उगवला आहे पण मावळला नाही – सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे

मावळच्या जनतेला राष्ट्रवादीने आमदार सुनिल शेळके सारखा  एक हिरा दिला – आमदार निलेश लंके

आजचा दिवस म्हणजे ऐतिहासिक क्षण,25 वर्षाचा बॅक लॉक भरून काढण्याचं काम करीन – आमदार सुनील शेळके

वडगाव मावळ (पुणे) – मावळचे आमदार सुनील शेळके यांच्या अभिष्टचिंतन सोहळ्यानिमित्त तसेच मावळ तालुक्यामध्ये विविध विकास कामांचे भूमिपूजन व उद्घाटन सोहळा राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार, सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्या हस्ते पार पडला.

शेळके यांच्या वाढदिवसानिमित्त मोठ्या संख्येने जनसमुदाय उपस्थित होता तसेच विविध नेतेमंडळींनी वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.

मावळ मधील विकासकामे भूमिपूजन व उद्घाटन पुढील प्रमाणे – पवनानदी पूल, इंद्रायणीनदी पूल, वडगाव नगरपंचायत अंतर्गत विकास कामे, वडगाव पोलीस स्टेशन इमारत, तळेगाव नगर परिषद हद्दीतील रस्त्यांची कामे मिशन अंतर्गत विविध विकास कामे, लोणावळा येथील उपजिल्हा रुग्णालय, कार्ला येथील एकवीरा देवीच्या रस्ता,कान्हे येथील उपजिल्हा रुग्णालय, वडगाव येथील प्रशासकीय इमारत,पोलीस स्टेशन इमारत व इतर कामांसाठी भरीव निधी दिला गेला.

या कार्यक्रमामध्ये  जिल्हा परिषदचे माजी सदस्य गुलाब वरखडे, वडगाव नगरपंचायत चे नगराध्यक्ष मयूर ढोरे, भाजपाचे माजी अध्यक्ष रामनाथ वारिंगे, जांभूळचे माजी सरपंच संतोष जांभूळकर, देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्डाचे माजी उपाध्यक्ष अरुणा पिंजण, अजिंक्य टिळे, संजय बाविस्कर, गोकुळ किरवे, अजित चौधरी,विशाल राऊत, अमित दळवी,नवनाथ खराडे,अनिल तुपे तुकाराम दळवी, दत्ता पवार शिवाजी तुपे, गोरखनाथ वरघडे वामन वारंगे, भारती गणपत गवारी, जयश्री सावंत, महेंद्र वाळुंज अविनाश गराडे,सतीश तुपे, सरपंच मारुती खामकर व इतर सदस्य अशा हजारोंच्या संख्येने पक्षामध्ये प्रवेश केला.

या वेळी पवार म्हणाले गेल्या 25 वर्षापासून मावळचा विका साचे बॅक लॉक भरून काढण्याचे काम पुढील काळात केले जाईल. तर सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे म्हणाले तीन सूर्याना (धनंजय मुंडे, निलेश लंके,सुनील शेळके) यांना जे ग्रहण लागले होते ते राष्ट्रवादीमध्ये आल्यानंतर फिटले पक्षामध्ये सर्वच पदाधिकाऱ्यांना चांगली वागणूक दिली जाते सर्वात जास्त तरुणनाई पक्षांमध्ये आहे. तसेच आमदार लंके म्हणाले मावळमध्ये राष्ट्रवादीने सुनील शेळके सारखा हिरा दिला तो जनतेची सेवा करीत आहे.

https://youtu.be/1bsb0iP_t4A

यावेळी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार, सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे,आमदार निलेश लंके,आमदार अतुल बेनके, आमदार सुनिल शेळके,माजी आमदार कृष्णराव भेगडे, माजी राज्यमंत्री मदन बाफना, जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर, जिल्हा अध्यक्ष भारती शेवाळे, तालुका अध्यक्ष बबन भेगडे, जिल्हा बँकेचे संचालक माऊली दाभाडे, ज्येष्ठ नेते शंकर शेळके, संत तुकाराम साखर कारखान्याचे उपाध्यक्ष बापूसाहेब भेगडे, चंद्रकांत सातकर ,पशुसंवर्धन सभापती बाबुराव वायकर, उपनगराध्यक्ष गणेश खांडगे, जिल्हाध्यक्ष सचिन घोटकुले, सुनील दाभाडे, वडगाव नगरपंचायतचे नगराध्यक्ष मयूर ढोरे ,जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष अर्चना घारे, जिल्हा परिषद सदस्या शोभा कदम, कुसुम काशीकर, जिल्हा सरचिटणीस विठ्ठल शिंदे, बाळासाहेब ढोरे गणेश काकडे ,सुभाष जाधव, संभाजी राक्षे, सुवर्णा खरात ,रूपाली दाभाडे,वैशाली दाभाडे व सर्व पदाधिकारी सर्व सरपंच उपसरपंच व मोठ्या प्रमाणात जनसमुदाय उपस्थित होता.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बबन भेगडे  व आभार सुभाष जाधव यांनी केले.

प्रतिनिधी:- सुखदेव जाधव (मावळ/पुणे)

Sanus's Fair Touch

pudhakar24news.com

pudhakar24news.com च्या सर्व लेखाचे हक्क राखून ठेवले आहे. pudhakar24news.com न्यूस पोर्टल च्या संबंधित कुठलेही वाद केवळ नागपूर सत्र न्यायाल्याच्या कार्यकक्षेतच राहतील.
Back to top button
error: Content is protected !!