Tathagat Vidhyalay-Karbhand
पारशिवनी

online Apps च्या माध्यमातून ई-पिक नोंदणी करिता शेतकऱ्यांची! सरपंच सौ शुभांगी भोस्कर यांचा अध्यक्षतेत सभा संपन्न

online Apps च्या माध्यमातून ई-पिक नोंदणी करिता शेतकऱ्यांची आमडी ग्रामपंचायत कार्यालय मध्ये सरपंच सौ शुभांगी भोस्कर यांचा अध्यक्षतेत सभा संपन्न

आमडी/पारशिवनी:-  दिनांक ११/१०/२०२२ ला आमडी ग्रामपंचायत कार्यालयामध्ये सरपंच सौ शुभांगी राजू  भोस्कर यांचा अध्यक्षते मध्ये सभा घेण्यात आली होती. या सभे मध्ये ई-पिक नोंदणी शेतकर्यांनी स्वता चा मोबाईल मधुन ई-पिक नोंदणी Apps द्वारे, नोंदणी कशी करायची याबाबद माहिती व प्रशिक्षण देण्यात आले. प्रशिक्षण देतांना प्रामुख्यानी उपस्तीथ मंडळ अधिकारी जगदने यांनी Apps द्वारे शेतकरी स्वता चा शेतातील पिकांची  नोंदणी करणे, गरजेच आहे समजावून सांगितले. शेतकर्यांना ई-पिक नोंदणी स्वतः करणे गरजेचे आहे त्यामागचे कारण शेतकरी बांधवांना व उपस्थित नागरिकांना आवर्जून समजावून सांगितले. पिक पाहणी मुदत १५ ऑक्टोंबर २०२२ पर्यत आहे. तरी ई-पिक पाहण्याकरिता ७/१२ चा पेरा करून घेण्याचे आव्हान सरपंच सौ शुभांगी राजू भोस्कर यांनी केले आहे. 

शेतकर्यांचे ई शेतपिक नोंदणी मुळे होणारे फायदे.  

१) शेतकर्यांचा शेतीमध्ये किती एकरा मध्ये कोणते पिक आहे हे ई-पिक नोंदनी ऑनलाईन माहिती मिळाल्या मुळे तलाठी /पटवारी शेतकर्यांचा ७/१२वर ऑनलाईन  नोंद करेल.

२)शेतकर्यांना शेतीवर (क्रॉप-लोन ) कर्ज घेते वेळी ७/१२वर पिकांची नोंद राहणे आवशक आसते.

३) शेतीमध्ये झालेल्या नुक्सान भरपाईत  ७/१२वर पिकांची नोंद असल्याने शासनाला नुकसान भरपाई निशचीत करता येते.

शेतकऱ्यांनि शेतपिकांचे ई-पिक नोंदणी न केल्याने होणारे नुकसान वर भरपाई करिता वरील कोणतेही लाभ मिळनार नाही. अशी शासनाची ताकीद असल्यानी तातडीची सभा बोलून शेतकरी बांधवांना ई-पिक विषये माहिती सादर करून online Apps द्वारे ई-पिक फॉर्म भरून घेतले.

जान्हीतात कार्य मोठ्या प्रमाणात होण्यासाठी आमडी-हिवरी ग्रामपंचायत सरपंच सौ शुभांगी राजू भोस्कर यांनी आमडी-हिवरी गावातील शेतकर्यांना ई-पिक नोंदणी Apps द्वारे स्वता चा शेतातील पिकांची नोंदणी करण्याची विनंती ह्या वेळी केली.

Sanus's Fair Touch

pudhakar24news.com

pudhakar24news.com च्या सर्व लेखाचे हक्क राखून ठेवले आहे. pudhakar24news.com न्यूस पोर्टल च्या संबंधित कुठलेही वाद केवळ नागपूर सत्र न्यायाल्याच्या कार्यकक्षेतच राहतील.
Back to top button
error: Content is protected !!