Tathagat Vidhyalay-Karbhand
कन्हानकांद्री-कन्हानपारशिवनी

WCL च्या धुळ मुळे त्रस्त कन्हान नागरिकांचा WCL  सब एरियाशी चर्चा

आंदोलन करण्याचा इशारा : आमदार आशिष जैस्वाल

WCL च्या धुळ मुळे त्रस्त कन्हान नागरिकांचा WCL  सब एरियाशी चर्चा,आंदोलन करण्याचा इशारा : आमदार आशिष जैस्वाल

कन्हान: कन्हान लगत होत असलेल्या वेकोली द्वारे माती भरणा प्रकरणी व त्याद्वारे होत असलेल्या धूळ प्रदूषण द्वारे  नागरिक त्रस्त. कन्हान वासियांनी व वेकोली लगत असलेल्या गावातील नागरिकांनी केली वेकोली सब एरिया यांच्याशी भेट. वेकोली येथे स्थानिक आमदार सह ग्रामस्थांची WCL  सबएरिया कामठी ओपन कस्ट माईन यांच्याशी सभा चर्चा.

धूळने त्रस्त :-

मागील दोन वर्षा पेक्षा जास्त काळापासून WCL  द्वारे मोठ्या प्रमाणात उत्खान्नन करून कन्हान लगत क्षेत्र पिपरी,धरमनगर,अशोक नगर , सुरेश नगर, राय नगर , कन्हान व कांद्री लगत दखणे हायस्कूल, हिराबाई कन्या शाळा,  ह्या क्षेत्राजवळ माती डम्प केल्यानी मोठ्या प्रमाणात धुळीचे प्रकोप आल्याचे बघायला दिसत्य. कन्हान मधील वेकोली लगतच्या शाळेच्या मुलावर व र्यांच्या आरोग्यावर परिणाम होत आहे. मुलांच्या जेवण मध्ये धुळीचे जाने नाकारता येत नाही. वेकोली च्या २४ तास सुरु असलेल्या मोठ्या प्रमाणात उत्खान्नन मध्ये, मोठ्या प्रमाणार मातीचे धीगाळ कन्हान च्या क्षेत्रात लागून डम्प करीत असल्यानी स्थानिक नागरिकाचे धुळीमुळे आरोग्य धोक्यात येत असल्यानी ग्रामास्थाच्या मनात चिंतेचा विषय निर्माण झाला आहे. स्थानिक नागरिकांच्या राहणीमानात खालच्या तळावर बदल होत आहे, ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात आले आहे. त्यांना अस्थमा व TB सारखे आजार होण्यास नाकारता येत नाही. लोकांच्या घरावर मोठ्या प्रमाणात धुळीचे आच्छादन निर्माण झाले आहे. वृक्षांवर, मोटार वाहन , दुचाकी, वाहनांवर मोठ्या प्रमाणात धुळीचे आच्छादन तयार होत आहे. धूळ चा इतका मोठा प्रभाव आहे सकाळी मोठी परत तयार झालेली असते.

दगान/ ब्लास्टिंग ने त्रस्त :- 

कन्हान क्षेत्र WCL चा नसतांना आज WCL लगतच्या क्षेत्राला! मोठ्या प्रमाणात कोळश्याच्या खाणीचे होणारे दुषपरिनाम भोगावे लागत आहे. आज साधारण जनतेला कोळश्याच्या खाणीमुळे धूळ असो कि मोठ्या प्रमाणात ब्लास्टिंग असो, ग्रामस्थांना सोसावे लागत आहे. वेकोली मुळे मोठ्या प्रमाणात दगान होतो. दगान/ ब्लास्टिंग इतक्या मोठ्या प्रमाणात होतो  कि मोठ मोठे सिमेंट कोन्क्रीट / RCC घरे हादरून घराणा भेगा पडायला सुरवात झाली आहे. घराचे दार व खिडक्या जोरजोरात हलत असतात, जणू भूकंप आहे.  ह्याला कोण जबाबदार आहे ?. असा प्रश्न ग्रामस्थांच्या मनात निर्माण झाला आहे.  ज्याचे घरे जुनी आहे अश्यांना तर सर्वात मोठ्ठा प्रशन निर्माण होतो. कि आमच्या घराची नुकसान भरपाई कोणी द्यावा.

भूमिगत पाणी स्त्रोत दिवसे दिवस कमी:-

मोठ्या प्रमाणात होत असलेलेया उत्खन्न्न मुळे भूमिगत पाण्याचा साठ संपत चालला आहे. पाण्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान होऊन जमिनीतील पाण्याचे अस्तित्व संपन्याचा मार्गावर आले आहे. वेकोली लगत च्या परिसरात मोठमोठ्या पाण्याच्या विहिरी यांचे पाणी आठून विहिरी कोरड्या पडल्या आहेत. वेकोली च्या उत्खांना मोठ्या प्रमाणात होत असतो ज्याचे  खोलीकरण जवळपास ५०० ते १००० मीटर इतके  होतो व ह्या कारणांनी निसर्गावर ह्याचा मोठ्या प्रमाणात विपरीत परिणाम होत असल्याचे नाकारता येत नाही.

निसर्गाच्या साधन संपत्तीचा इतक्या मोठ्या प्रमाणात नुकसान होत असल्यानी सभोवतालच्या नैसर्गिक साधनसंपत्तीचा नुकसान व नैसर्गिक संपत्तीचा संप झाल्याशिवाय राहणार नाही. वेकोली आपल्या हदितीत व राहून करत नाही व ज्या प्रकारे नियम आहे . नियमाचे पालन न करता नियम बाह्या कार्य करून समस्त जनतेला व प्रशासनाला फसविण्याचे कार्य करीत असल्याचे नाकारता येत नाही.

रोजगार :-

स्थानिक नागरिकांना कुठल्याच प्रकारे रोजगार उपलब्ध नाही, आज वेकोली च्या परिक्षेत्रात खाजगी कंपन्यांना काम दिले आहे , त्यात मोठ्या प्रमाणात परप्रांतीयांना कामावर ठेवले आहे, पण स्थानिक नागरिकांना मात्र समस्त सुविधेपासून वंचित ठेवण्यात आले आहे. आज त्याच क्षेत्रात इतर परप्रांतीय! रोजगार मिळून आपले प्रपंच चालवीत आहेत  पण स्थानिक ग्रामस्थ हे वेकोली (wcl) कंपनीचा धूळ व माती खाऊन आरोग्य धोक्यात घालवत आहेत.

कन्हान व वेकोली लगतच्या गावाच्या ग्रामस्थांचे असेही म्हणणे आहे कि कन्हान शहर मधील पिपरी परिसर ह्यावर्षी सलग २ दा पुराणी ग्रस्त झाला होता त्याचे कारण असे कि पिपरी परिसर जे कि कन्हान मधीलच क्षेत्र आहे, हे वेकोली द्वारे मोठ्या प्रमाणात मातीचे मोठे पहाड उभा केल्यानी नदीचे पाणी व इतर क्षेत्रातून वाहून येणारे पाणी अडल्यानी मोठ्या प्रमाणात पूर येऊन नागरिकांचे नुकसान झाले होते.

त्यांना आपला जीव वाचवून दुसर्या ठिकाणी स्थलांतर करावे लागले होते. त्यात नागरिकांचा मोठ्या प्रमाणात नुकसान झाला असून त्यांची घरे पाण्यात बुडाली, अन्न धान्याचा नुकसान झाला, घरातील वस्तूंचा मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. इत्यादी समस्यांना समोर जावे ग्रामीण ग्रामस्थ आणि रोजगार परप्रांतीयांना असा प्रश्न स्थानिक नागरिकांच्या मधातून तोंड वर करून येत आहे.

वेकोली सब एरिया शोबत वरील विषयावर चर्चा करीत अस्तांनी ह्यावेळी प्रामुख्यानी उपस्थित : रामटेक विधानसभा आमदार श्री आशिष जैस्वाल ,कन्हान नगराध्यक्षा सौ करूना आष्टनकर, कन्हान नगर परिषद मुख्यधिकारी वर्धराज पिल्ले, डायनल शेंडे, राजेश यादव, राजेंद्र शेंद्र, छोटू राणे, जितेंद्र चव्हाण,अजय लोंडे, भारत पगारे, अजय चव्हाण , हरीश तिडके , इंदिरा कुर्मी, पुष्पा कावलकर, रेखा टोहने, सनी सिंह,चिंटू वाकुलकर, समशेर पुरवले, किशोर लेकुरवाळे, मोठ्या संखेने नागरिक उपस्थित होते.

Sanus's Fair Touch

pudhakar24news.com

pudhakar24news.com च्या सर्व लेखाचे हक्क राखून ठेवले आहे. pudhakar24news.com न्यूस पोर्टल च्या संबंधित कुठलेही वाद केवळ नागपूर सत्र न्यायाल्याच्या कार्यकक्षेतच राहतील.
Back to top button
error: Content is protected !!