Tathagat Vidhyalay-Karbhand
ब्रह्मपुरी

लहान बालकांमध्ये आढळणाऱ्या हर्निया रोगावर ग्रामीण रुग्णालयात पार पडल्या यशस्वी शस्त्रक्रिया

लहान बालकांमध्ये आढळणाऱ्या हर्निया रोगावर ग्रामीण रुग्णालयात पार पडल्या यशस्वी शस्त्रक्रिया

ब्रम्हपुरी –   राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम (RBSK)  उपक्रमा अंतर्गत ग्रामीण रुग्णालय ब्रम्हपुरीच्या वतीने ब्रम्हपुरी तालुक्यातील शालेय विद्यार्थ्यांची तपासणी करीत असताना, मुलांच्या बेंबीमध्ये नाळ चिकटलेल्या ठिकाणचे स्नायू कमजोर असणे, लहान मूल रडताना बऱ्याचवेळा बेंबी फुगलेली दिसणे अशी अनेक हर्निया आजाराची लक्षणे वैद्यकीय अधिकाऱ्यांना दिसून आली.

या आजाराची शस्त्रक्रिया खाजगी रुग्णालयात करण्यासाठी सर्वसामान्य गरीब कुटुंबातील रुग्णांना जवळपास वीस ते बावीस हजार एवढा खर्च अपेक्षित होता. परंतु प्रत्यक्षात गरीब वा सर्वसामान्य कुटुंबातील व्यक्ती या शस्त्रक्रियेसाठी आपल्या पाल्यावर एवढा आर्थिक खर्च करू शकणार नव्हते, शिवाय चंद्रपूर जिल्ह्या पासून ब्रम्हपुरी तालुक्याचे अंतर बरेच लांब व आवागमान करीता खर्चिक बाब असल्याने चंद्रपूर जिल्ह्याला जाऊन ही शस्त्रक्रिया करणे त्यांना आर्थिक दृष्ट्या परवडनारे नव्हते, ही बाब लक्षात घेऊन ग्रामीण रुग्णालय ब्रम्हपुरीच्या वैद्यकीय अधिक्षकांनी पुढाकार घेत, स्थानिक उपजिल्हा रुग्णालय ब्रम्हपुरी येथे  ४ जून  शनिवारला हर्निया रोगावर मोफत शस्त्रक्रिया आयोजन केले.

या शिबिरात ब्रम्हपुरी तालुक्यातील १० शालेय विद्यार्थ्यांची  हर्निया रोगावर मोफत शस्त्रक्रिया पार पडली. हर्निया रोगावर मोफत शस्त्रक्रिया शिबिरात बाय लॅटरल ०१, अंबिलिकल कॉड ०१ व हर्निया ०१  फायमोसिस ०१ आदी. प्रकारच्या शस्त्रक्रिया यशस्वी पार पाडण्यात आल्या. शस्त्रक्रिया करण्यापूर्वी वैद्यकिय अधिकाऱ्यांनी सर्व शालेय विद्यार्थ्यांच्या रक्ताचे नमुने घेत रक्ताच्या तपासण्या केल्या. त्यामुळे शस्त्रक्रिया करताना कोणत्याही प्रकारचा त्रास उद्भवला नाही, हे विशेष. सदर शिबिराच्या यशस्वी आयोजना करिता बाहेरून तज्ज्ञ डॉक्टरांना पाचारण करण्यात आले होते. त्यामुळे लहान मुलांमधील हर्निया रोगावर मोफत शस्त्रक्रिया यशस्वीपणे पार पाडण्यात आल्यामुळे लहान मुलांच्या पालकांनी समाधान व्यक्त केले.

या शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी वैद्यकीय अधिक्षक डॉ.प्रितम खंडाळे, डॉ.मनीष शिंग ( सर्जन ) वैद्यकीय अधिक्षक भद्रावती, डॉ.कपिल अन्नलदेवर ( सर्जन ) डॉ. पटले ( सर्जन ) डॉ.इंगळे ( भुलतज्ञ ) डॉ. लीचडे ( भुलतज्ञ ) डॉ.कामडी , तसेच आर बी एस के डॉ.सिडाम ,डॉ.खरकाटे, डॉ. रामणे, डॉ.स्नेहल कहूरके, रुपेश सर, आश्लेषा सिस्टर, प्रिया सिस्टर, ठाकरे सिस्टर,व ग्रामीण रुग्णालयातील सर्व आरोग्य कर्मचारीवृंद यांनी सहकार्य करून हे शस्त्रक्रिया शिबीर यशस्वी पार पाडले.

राहुल भोयर

Sanus's Fair Touch

pudhakar24news.com

pudhakar24news.com च्या सर्व लेखाचे हक्क राखून ठेवले आहे. pudhakar24news.com न्यूस पोर्टल च्या संबंधित कुठलेही वाद केवळ नागपूर सत्र न्यायाल्याच्या कार्यकक्षेतच राहतील.
Back to top button
error: Content is protected !!