Tathagat Vidhyalay-Karbhand
विदर्भ

वाढती महागाई, जी एस टी विरोधात व जिल्हा ओला दुष्काळ जाहीर करून हेक्टरी 50 हजार रुपये मदत करण्याची मागणी

वाढती महागाई, जी एस टी विरोधात व जिल्हा ओला दुष्काळ जाहीर करून हेक्टरी 50 हजार रुपये मदत करण्याची मागणी

भाकपच्या नेतृत्वात जिल्हाधिकारी कार्यालय समोर धरणे व निदर्शने.

विदर्भात आणि मराठवाड्यात जुलै महिन्यात सातत्याच्या अतिवृष्टीमुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे जलसिंचन, महाजनको, कोल माइन्स, याची पोल उघड पडली आहे. चंद्रपुर जिल्ह्यात गोसेखुर्द धरणाचे व इरई नदी धरणाचे दरवाजे उघडल्या मुळे विसर्ग-बॅक वाटर – पाऊस यामुळे हजारो हेक्टर शेती बरबाद झाली आहे. दुबार पेरण्या, परत आधीच कर्जाच्या ओझ्याखाली दबलेले शेतकरी या अतिवृष्टी व पुरामुळे पुरता बरबाद झाला अनेकांची घर कोसळली तर हजाराच्या हेक्टर च्या वर शेतीचे नुकसान झाले आहे. अश्यावेळी शेतकरी याच्या मदतीला धावून जाणे हि शासनाची सैऺवेधानिक जवाबदारी आहे. केद्र सरकारचे एनडीआरएफ चे निकष, हे न्याय देणारे नाहीत. मागील वर्षी साऺगली- कोल्हापूर च्या पुरग्रस्ता॑ना दिलेली ४० हजार रूपये हेक्टर प्रमाणे शासनाने केलेली मदत, याचा विचार करून किमान ५० हजार हेक्टरच्या वर मदत घोषित करण्याची आवश्यकता आहे.

तसेच नैसर्गिक आपत्तीने जनता त्रस्त असतांना दैनंदिन जीवनातील सर्व वस्तूंच्या खरेदीवर जी एस टी लावून आपल्या सरकारनी महागाई अधिक भडकवली आहे यांचा विरोध करण्यासाठी देशपातळीवर काम करणाऱ्या डाव्या विचाऱ्याच्या अखिल भारतीय खेत मजदूर युनियनच्या वतीने 1 ऑगस्ट 2022 रोजी प्रतिरोध दिवस पाळुन देशभर तीव्र आंदोलन करण्याचे आवाहन केले होते त्याला प्रतिसाद देत चंद्रपुर येथे जिल्हाधिकारी कार्यालय समोर भारतीय कम्युनिस्ट पक्ष, किसान सभा,लाल बावटा खेत मजूर युनियन व आयटक च्या नेतृत्वात
या धरणे आ॑दोलनाच्या वतीने तीव्र निदर्शने करीत विविध मागण्यांचे निवेदन मा अजय गुलहाने यांच्या मार्फत मा पंतप्रधान व मुख्यमंत्री यांना दिले.

सदर आंदोलनाचे नेतृत्व भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे जिल्हा सचिव कॉ प्रा नामदेव कंनाके, आयटक जिल्हा सचिव कॉ विनोद झोडगे, किसान सभा नेते कॉ प्रकाश रेड्डी, लाल बावटा शेत मजूर युनियनचे कॉ रवींद्र उमाटे, शालेय पोषण आहार युनियन चे जिल्हा सचिव कॉ वनिता कुंठावार, आशा वर्कर संघटनेच्या कॉ सविता गटलेवार, प्रतिमा कायरकर,प्रमिला बावणे यासह आदी पदाधिकारी यांनी केले.

या आंदोलनाद्वारे खालील मागण्या करण्यात आल्या.वाढती महागाई कमी करा,जी एस टी रद्द करा. अतिवृष्टी मुळे नुकसान झालेल्या शेतकर्यांना ५० हजार हेक्टरी मदत करा. घरांची पडझड झाल्याने त्यांना तातडीने घरकुल मंजूर करा. गोसेखुर्दधरण ,इरई नदी पाणी विसर्ग यामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना विशेष मदतीची व्यवस्था करावी.
वन हक्काचे प्रलऺबित दावे व पुर्णविचार याचिका निकालात काढा. भुविकास बॅका बऺद झाल्या असून, वित्तमऺत्र्याऺनी शेतकऱ्यांना कर्ज माफीची घोषणा केली. तेव्हा त्यांच्या सात- बारा वरील बोझा काढा. वनपट्टे प्राप्त झालेल्या शेतकर्यांना स्वतंत्र सात-बारा, फेरफार, शासकीय बॅ॑केकडुन पीककर्ज, अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसान भरपाई करीता शासकीय मदत, व अन्य शासकीय योजना लागू करा. शेतीचे नुकसान करणाऱ्या वन्य प्राण्यांचा बंदोबस्त करा.ब्रम्हपुरी विभागातील नर भक्षक वाघाचा बंदोबस्त करा यासह आदी मागण्या करण्यात आल्या.

Sanus's Fair Touch

pudhakar24news.com

pudhakar24news.com च्या सर्व लेखाचे हक्क राखून ठेवले आहे. pudhakar24news.com न्यूस पोर्टल च्या संबंधित कुठलेही वाद केवळ नागपूर सत्र न्यायाल्याच्या कार्यकक्षेतच राहतील.
Back to top button
error: Content is protected !!