Tathagat Vidhyalay-Karbhand
चंद्रपूरब्रह्मपुरी

प्रशिक्षीत मनुष्यबळ निर्मितीसाठी कोविड क्रॅश कोर्स प्रोग्राम

प्रशिक्षीत मनुष्यबळ निर्मितीसाठी कोविड क्रॅश कोर्स प्रोग्राम

 ईच्छुक पात्र उमेदवारांनी लाभ घेण्याचे आवाहन

चंद्रपूर दि. 21 ऑक्टोबर कोविडच्या पार्श्वभुमीवर प्रशिक्षीत मनुष्यबळासाठी प्रधानमंत्री कौशल्य विकास योजना 3.0 अंतर्गत कोविड क्रॅश कोर्स प्रोग्राम या अभ्यासक्रमाचे प्रशिक्षण युवक-युवतींना देण्यात येणार आहे. यासाठी इच्छुकांनी जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राशी संपर्क साधण्याचे आवाहन सहाय्यक आयुक्त भय्याजी येरमे यांनी केले आहे.

या अभ्यासक्रमात कोविडच्या रुग्णांवर उपचार करण्यासाठी आवश्यक असणाऱे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. प्रधानमंत्री कौशल्य विकास योजना 3.0 अंतर्गत कोविड क्रॅश कोर्स प्रोग्राम राबविण्यात येत आहे. हेल्थ केअर सेक्टर स्किल कौन्सिलमधील विविध अभ्यासक्रम उपलब्ध करून देण्यात आले असून या कोर्सकरिता उमेदवाराची वयोमर्यादा 18 ते 45 वर्षापर्यंत असणे आवश्यक आहे. या  प्रशिक्षणाचा लाभ घेण्यासाठी ईच्छुक पात्र उमेदवारांनी 26 ऑक्टोबर 2021 पर्यंत httpsforms.gle9RxTAeEHzJfDAnEh7 या गुगलफॉर्म द्वारे नोंदणी करावी.

प्रशिक्षणासाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता

इर्मजन्सी मेडिकल टेक्निशियन व फेबोटॉमिस्ट या पदाकरिता शैक्षणिक पात्रता विज्ञान विषयासह बारावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. जनरल ड्युटी असिस्टंट, जनरल ड्युटी असिस्टंट ऍडव्हान्स तसेच होम हेल्थ ऐड पदासाठी दहावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. तर मेडिकल इक्विपमेंट टेक्नॉलॉजी असिस्टंट पदासाठी दहावी, आयटीआय तसेच इलेक्ट्रॉनिक्स, मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल, कम्प्युटरशी संबंधित 3 वर्षाचा अनुभव असणे आवश्यक आहे.

या प्रशिक्षण, कोर्सच्या अधिक माहितीसाठी जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, प्रशासकीय इमारत, पहिला माळा, हॉल क्रमांक 56, चंद्रपूर येथे प्रत्यक्षपणे अथवा 07172-252295 या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधता येईल.

प्रतिनिधी राहुल भोयर (ब्रम्हपुरी,चंद्रपूर)

Sanus's Fair Touch

pudhakar24news.com

pudhakar24news.com च्या सर्व लेखाचे हक्क राखून ठेवले आहे. pudhakar24news.com न्यूस पोर्टल च्या संबंधित कुठलेही वाद केवळ नागपूर सत्र न्यायाल्याच्या कार्यकक्षेतच राहतील.
Back to top button
error: Content is protected !!